मुंबई – 2019 ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी पाठवल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. मात्र, मातोंडकर अथवा शिवसेना यांनी याबाबतचा कोणताही अधिकृत तपशील जाहीर केला नाही.
कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एक वर्षाने मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या आधी मार्च 2019 मध्ये मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पाचच महिन्यात सप्टेंबर 2019मध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.