नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यानुसार व्हॅक्सिनचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलू शकते अशी माहिती आहे. रॉयटर्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.
यासंदर्भात सर्वसाधारण बजेटची घोषणा केली जाऊ शकते. फेब्रुवारी शेवटपर्यंत करोना लसीकरण सुरु होऊ शकते.
करोनाला पूर्णपणे नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकार शक्य तितके प्रयत्न करत असून लसीकरणाचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात सहमती मिळाली तर अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते असेही म्हटलं जातंय.
देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर म्हणजे पाचशे रुपयांहून अधिक खर्च येईल. या कारणाने सरकारने 130 कोटी जनतेसाठी लस द्यायला पाचशे अब्जचे बजेट ठेवल्याचे म्हटले जात आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी याची व्यवस्था केली जाऊ शकते. त्यानंतर लसीसाठी निधीची उणीव भासणार नाही असा दावा करण्यात आला आहे.