मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मुतीदिन आहे. दरवर्षी शिवसैनिक त्यांना शिवतीर्थावर जाऊन अभिवादन करत असतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे शिवसैनिकांनी जेथे असाल तेथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने बाळासाहेबांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारक उभारण्यात न आल्याबद्दल टीका केली आहे. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
निलेश राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्ताने एक ट्विट केलं असून त्यात, “बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.” असा संदेश लिहला आहे.
बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2020
महत्वपूर्ण बातम्या
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले…
मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचे एक स्वप्न पूर्ण, दुसरे आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ