फलटण – मुंजवडी (ता. फलटण )येथे कुऱ्हाड, दगड, वीट आदीं साहित्याचा वापर करून डोक्यात घाव घालून आशिष सुनील माने (वय २२) याचा खून केला असून एक जण जखमी आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामधून मिळालेली माहिती व फिर्यादी मुलाची आई सुनीता सुनील माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंजवडी गावाच्या हद्दीत रामोशी आळी येथे माझी सून कामिनी ही रोहित दादा खोमणे यास फोन करुन सारखी बोलावते या कारणावरुन चिडून जाऊन मला तसेच सून कामिनी हिस लाथाबुक्क्यांनी, दगड विटाने मारहाण केली.
तसेच धाकटा मुलगा संकेत यास कुऱ्हाडीने डोक्यात मारुन जखमी केले. या मारामारीत थोरला मुलगा आशिष यास मारहाण करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सिमेंटच्या कट्टयावर आपटून त्याचा खून केला. तसेच लहान मुलगा संकेत सुनील माने यास कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी रोहित दादा खोमणे (रा.मुंजवडी ता.फलटण) , आशाबाई ऊर्फ नकुसा अरुण आडके (रा.पाटस जि. पुणे) , दत्तु बबन सितकल (रा. मुंजवडी ता. फलटण) , सुनील अरुण आडके (रा. पाटस जि. पुणे), जया बाळु जाधव (रा. आसु ता.फलटण) , अर्चना दादा खोमणे (रा. मुंजवडी ता. फलटण) या सहा जणांच्या विरोधात फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली असून दिलेल्या फिर्यादी नुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर ६०९ / २०२० भा. द.वि.क ३०२,३२४, १४३, १४७, १४८, १४९ , ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.