चिंबळी (पुणे) – खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मरकळ ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ कोयाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी चेंबरचे झाकण तुटले आहे. या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे येथील ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
मरकळ येथे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक व रहदारी असल्याने कोयाळी-मरकळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक तसेच ग्रामृस्थाची वर्दळ सतत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी चेंबरचे झाकण तुटले असल्याने पायी चालणे व दुचाकी मोटरसायकल चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी माघाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कामासाठी मजूर मिळत नसल्याने काम रखडले आहे; परंतु येत्या दोन दिवसांत या चेंबरचे झाकण बसविण्यात येणार आहे.