सर्बिया : भारतीय अनुभवी बाॅक्सिंगपटू मीना कुमारी (५४ किलो) , मोनिका (४८ किलो), रितु ग्रेवाल (५१ किलो ) आणि भाग्यवती कचारी (७५ किलो) यांना सर्बिया येथे पार पडलेल्या महिला बाॅक्सिंगच्या ९ व्या नेशन कप (9th Nation Cup) स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावं मानवे लागले आहे.
🥊The young Italian trio as Sorrentino, Testa and Nicoli all won their finals at the Nations Women’s Cup
🏆9th Nations Cup – January 13/21, 2020 (Sombor, Serbia)#EUBC #boxing #BoxingNews— EUBC Boxing (@EUBCBOXING) January 21, 2020
पवित्रा (६० किलो) आणि प्लिवाओ बासुमतारी (६४ किलो) यांनी कांस्यपदक पटकावलं आहे. मागील वर्षी कोलोन विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या मीनाकुमारी हिचा इटलीच्या जियोदराना सोरेंतिनो हिने १-४ असा असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
मोनिकाचा रूसच्या लूलियाने पराभव केला. रितुचा चीनच्या केई यान हिने ०४ असा तर राष्ट्रीय चॅम्पियन भाग्यवतीचा मोरक्कोच्या खदीजा मार्डी हिने १-४ असा पराभव केला.