सातारा – जिल्ह्यातील 91 जणानचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८४५ वर पोहचली आहे.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा शहरातील ९ रुग्णांसह वाई, शिरवळ, पुनवडी, जिहे या गावातील रुग्णसंख्या मोठी खहे. १२ पोलीस आणि एकाच कुटुंबातील १४ जण पाँझिटिव्ह आल्याने वाई शहर हादरले आहे.
आरोग्य विभागाकडून काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील निकट सहवासातील 88 आणि प्रवास करुन आलेले 3 अशा एकूण 91 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 91 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, 12, 60, 55, 50, 45, 50, 18, व 45 वर्षीय महिला, 12, 5, 34, 34 आणि 51 वर्षीय पुरुष. सरताळे येथील 50 वर्षीय महिला.
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील बुधवार पेठेतील 12, 13 आणि 35 वर्षीय पुरुष, मंगळाई कॉलनीतील 34 वर्षीय पुरुष, 56 आणि 37 वर्षीय महिला, रेणुका हौऊसिंग सोसायटीतील 30 वर्षीय पुरुष, भैरोबा पायथा येथील 50 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 40 वर्षीय पुरुष, शहापूर येथील 45 वर्षीय महिला, करंडी येथील 48 वर्षीय पुरुष, 44 आणि 39 वर्षीय महिला, जिहे येथील 66, 42, 57 आणि 69 वर्षीय पुरुष, 72, 39, 80, 19, 50, 24, 19 आणि 32 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 60 वर्षीय महिला, कण्हेर येथील 13 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 40, 32, 27, 27, 27, 31, 38, 52, 25, 42, 40, 10, 51, 15, 5, 68, 11, 65, 47, 18 वर्षीय पुरुष, 35, 12, 22 आणि 60 वर्षीय महिला, पाचवड येथील 34 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय पुरुष, तारुख येथील 31 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 24 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 33 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30, आणि 10 वर्षीय महिला, 68, 30, 7, 40, 48 आणि 39 वर्षीय पुरुष. नायगाव येथील 25 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील चितळी येथील 23 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील वारुगड येथील 51 वर्षीय पुरुष
फलटण तालुक्यातील फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील 46 वर्षीय पुरुष, उपळवे येथील 52 वर्षीय पुरुष, आसू येथील 30 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 42 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष.
एका बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा वडूज ता. खटाव येथील 70 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.