सविंदणे – शिरूर तालुक्यातील कवठे-येमाई येथील जवळपास 55 पोल्ट्री व्यावसायिकांकडे सुमारे 9 लाख रुपये कर थकबाकी आहे. संबंधितांनी ग्रामपंचायतीस बाकी असलेला कर तातडीने जमा करावा, असे आवाहन शिरूर पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी केले आहे.
कवठे येमाई ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत थकबाकीदार पोल्ट्री व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण मुंजाळ होते. ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी थकबाकीदार पोल्ट्री व्यावसायिकांना तातडीने ग्रामपंचायतीस देय बाकी असलेला कर भरावी.
दरम्यान, पोल्ट्री व्यावसायिकांकडे थकबाकी असून याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाने दिलासा देण्याची व सध्या आकारण्यात येणारा कर कमी करण्याची मागणी माजी उपसरपंच बबनराव वागदरे, अरुण रोहिले, ठकाजी गावडे, रामदास माळवदे, बबन गावडे व इतर पोल्ट्री व्यावसायिक यांनी केली आहे.