आ. शिवेंद्रराजेंचे विशेष प्रयत्न; बांधकाम विभागाकडून दरवर्षी होणार देखभाल, दुरुस्ती
सातारा (प्रतिनिधी) – सातारा तालुक्यातील नऊ आणि जावळी तालुक्यातील 7 इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांची आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती झली आहे. हे नवीन 16 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आले असून दरवर्षी या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती होणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार सातारा तालुक्यातील राज्य मार्ग 140 ते कण्हेर, वेळे, कसुंबी, मोहोट, म्हाते खुर्द, वागदरे ते इतर जिल्हा मार्ग 31 ते मानेवाडी या रस्त्यांचा मिळून नवीन प्रमुख जिल्हा मार्ग (दहा किमी) 131 अशी दर्जोन्नती देण्यात आली आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग 29 ते पोगरवाडी, आरे, दरे, रेवंडे, वावदरे, राजापुरी ते प्रजिमा 29 या 18.6 किमी लांबीच्या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग 132 म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. प्रजिमा 135 ते अंबवडे बुद्रुक, करंजे, शिंदेवाडी, मस्करवाडी, लावंघर, अनावळे ते प्रजिमा 37 या 12 किमी रस्त्याची प्रजिमा 133, राष्ट्रीय महामार्ग 4 ते शेंद्रे, वेचले, डोळेगाव, भाटमरळे, कुसवडे, नरेवाडी या 13.4 किमी रस्त्याची प्रजिमा 134, भोंदवडे, अंबवडे बुद्रुक, सायळी, वडगाव, सावली, कुरुलबाजी, कुडेघर, रोहोट, पाटेघर, आलवडी, धावली या 32 किमी रस्त्याची प्रजिमा 135, प्रजिमा 29 परळी, बनघर, कुस खुर्द, कुस बुद्रुक, खडगाव, ताकवली, निगुडमाळ, नित्रळ, कातवडी, केळवली, धनगरवाडी, धावली ते प्रजिमा 26 या 30 किमी रस्त्याची प्रजिमा 136, मर्ढे ते राष्ट्रीय महामार्ग 4 लिंब, बसाप्पाचीवाडी, आरळे, पाठखळ, वाढे, म्हसवे, वर्ये, नेले, धावडशी, आकले ते रा. मा. 140 या 31.5 किमी रस्त्याची प्रजिमा 137, आसनगाव, कुसवडे, निनाम, सोनापूर, गणेश खिंड ते कोंजावडे या 17.6 किमी रस्त्याची प्रजिमा 138, प्रजिमा 29 ते ठोसेघर, चिखली, जांभे, बोपोशी, करंजोशी, आवार्डे ते प्रजिमा 83 या 14.6 किमी रस्त्याची प्रजिमा, अशी दर्जोन्नती करण्यात आली आहे.
जावळी तालुक्यातील महू, पिंपळी खुर्द, वालुथ, हुमगाव, इंदवली, दरे, करंदोशी या 19 किमी रस्त्याची प्रजिमा 139, कास, एकीव, गाळदेव, माचुतर या 33.5 किमी रस्त्याची प्रजिमा 140, गोगवे, वरसोळी, गाळदेव, वाघदरे, म्हाते, मोहाट, गांजे, तांबी, खरोशी, निझरे, कामथी, वेळे, कण्हेर या 21.5 किमी रस्त्याची प्रजिमा 141, दिवदेव, मार्ली, भालेघर, आखाडे जोड रस्ता या दहा किमी रस्त्याची प्रजिमा 142, राष्ट्रीय महामार्ग 4 ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्वर, रा. मा. 140, या 14 किमी रस्त्याची प्रजिमा 143, मेढा (वेण्णा चौक), कुसुंबी, सह्याद्रीनगर, कोळघर फाटा, अंधारी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, बामणोली या 27.3 किमी रस्त्याची प्रजिमा 144 तर, रा. मा. 140 ते आंबेघर फाटा, पुनवडी, केडांबे, बोंडारवाडी या 13.5 किमी रस्त्याची प्रजिमा 145, अशी दर्जोन्नती करण्यात आली आहे.