मॉंटेरे पार्क (अमेरिका) – चांद्र नववर्षाच्या निमित्ताने लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये गोळीबार झाल्याने किमान 9 जण ठार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. कॅलिफोर्नियातील मॉंटेरे पार्कमधील गार्वेय ऍव्हेन्यू येथे आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीला किमान एक हजार जण उपस्थित होते. या पार्टीमध्ये रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी हा गोळीबार झाला, असे लॉस एंजेलिसच्या कौंटी शेरीफ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील चिनी नागरिक असुरक्षित; सुरक्षेची काळजी घेण्याचा चीनचे तालिबानला आवाहन
हा गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला डझनभर अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतरही काही तासांपर्यंत पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेचा कोणताच तपशील दिला नव्हता. हा हल्लेखोर एक पुरुष असल्याचीच माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार करणारा संशयित पकडला गेलेला नव्हता. या गोळीबारात नक्की किती जण जखमी झाले, हे देखील समजू शकलेले नव्हते.
Pakistan : ‘एसकेएमटी’ला दिलेले पैसे गृह प्रकल्पात गुंतवले – इम्रान खान
या पार्टीच्या ठिकाणी हल्लेखोर मशिन गन घूेन गेल्याचे पार्टीच्या जवळच्या एका हॉटेलवाल्याने सांगितले. लॉस एंजेलिसपासून 16 किलोमीटर अंतरावरील मॉंटेरे पार्क हे सुमारे 60 हजार लोकसंख्येचे शहर असून तेथे आशियाई नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. शनिवारी चांद्र वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये चांद्र वर्षाचा प्रारंभ मोठ्या आनंदात साजरा केला जात असतो. या आनंदाप्रित्यर्थ्य दोन दिवसांचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.