सांगलीत पुरग्रस्तांना घेवून जाणारी बोट उलटून १६ जणांचा मृत्यू

सांगली : राज्यात पुराची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे. दरम्यान, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून इथे बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, सांगलीत पुरग्रस्तांना घेवून जाणारी बोट उलटल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेत १९ जण  बुडाले असून १६  जणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोट उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर बेपत्ता असणाऱ्या नागरिकांचा शोध सध्या सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीतील कृष्णा नदीला आलेल्या पुराचा फटका सांगली आणि आजुबाजूच्या गावांना बसला आहे. त्यातच सांगलीत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान प्रयत्न करत आहेत. अशाच एका बोटीतून 25 ते 30 जणांना सुरक्षितस्थळी घेवून जातेवेळी पाण्याच्या प्रवाहात बोट पलटी झाली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्‍त करण्यात येत आहे. दरम्यान, इतर बेपत्ता झालेल्या नागरिकांचा सध्या शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.