पुणे – नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढावे याकरिता रिझर्व्ह बॅंक व्यावसायिक बॅंका आणि केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून भीम हे ऍप सुरू करण्यात आले होते. याचा वापर नागरिकांकडून अनेक व्यवहार करण्यासाठी केला जात आहे. आता भीम ऍपमध्ये मूल्यवर्धन करून त्याचा पुढील भाग ऑक्टोबर महिन्यात जनतेला उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे डिजिटल व्यवहार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या मूल्यवर्धित ऍपमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ऍपवरून ग्राहकांच्या अनेक बॅंक खात्यांतच्या माध्यमातून व्यवहार करता येऊ शकतील.
या घडामोडींची माहिती असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भीम ऍपमध्ये मूल्यवर्धन करण्याचे काम अनेक महिन्यापासून चालू आहे.