पुण्याला दिलासा; 884 नवे बाधित सापडले, 1,256 जण करोनामुक्त

पुणे  – शहरात सोमवारी नवीन करोना बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 884 बाधित नव्याने सापडले असून, 1 हजार 256 जण करोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे 37 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

 

सोमवारी (दि.21) दिवसभरात केवळ 2 हजार 697 संशयिताची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 77 हजार 629 जणांच्या तपासणी अहवालातून 1 लाख 32 हजार 665 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

त्यातील आतापर्यंत तब्बल 1 लाख 12 हजार 172 जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रीय बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

सध्या 17 हजार 372 बाधित सक्रिय असून, त्यातील 952 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 492 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 460 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.