‘या’ संघाने आतपर्यंत तब्बल 11 वेळा कर्णधार बदलले

आयपीएलमधील पंजाबच्या संघाने आतापर्यंत तब्बल 11 कर्णधार बदलले. याआधी एवढे कर्णधार आयपीएलमधील कोणत्याच संघाने बदलले नाहीत. यंदा आयपीएलचा तेरावा सीझन आहे. हा सीझन यूएईत खेळला जात आहे.

आतापर्यंत तीन सामने संपन्न झाले. तिसरा सामना पंजाब अणि दिल्ली संघात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 8 बाद 157 धावा केल्या होत्या. त्यांना प्रत्युत्तर देताना पंजाब संघाने ही 8 बाद 157 धावा केल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.

सामना निकाली काढण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली. त्यामधे पंजाब संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांनी 2 विकेट्स गमावत 2 धावा केल्या. दिल्ली संघाकडून रबाडाने 2 विकेट घेतल्या. दिल्ली संघाने हे टार्गेट 4 धावा काढून विजय साजरा केला. तत्पूर्वी या सामन्यात कॅप्टन पदाची धुरा के.एल.राहुलकडे होती.

आतापर्यंत पंजाब संघाचे नेतृत्व 11खेळाडूंनी केले होते. या मोसमात पंजाबचे नेतृत्व करणारा के.एल.राहुल 12 कर्णधार आहे . त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलमध्ये सर्वाधिक कर्णधार बदलणार संघ ठरला. सर्वाधिक कर्णधार बदलणाऱ्या यादीत दिल्ली कॅपिटल संघ दुसर्‍या स्थानी आहे.
यांच्यानंतर सनराइजर्स हैदराबाद अणि मुंबई इंडियन्स यांनी 7 वेळा कर्णधार बदलले आहेत. स्पर्धेतून बाहेर गेलेल्या पुणे वाॅरियरस इंडिया अणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर यांनी 6 वेळा कर्णधार बदलले. गुजरात लायन्स, चेन्नई सुपर किंग्ज अणि कोची टस्करस केरळ या संघांनी 2वेळा कर्णधार बदलले आहेत.

हे आहेत आतापर्यंतचे 11 कर्णधार-

ऍडम गिलख्रिस्ट, जॉर्ज बेली, युवराज सिंग, आर अश्विन, ग्लेन मॅक्सवेल, कुमार संगकारा, डेव्हिड हसी, मुरली विजय, डेविड मिलर, माहेला जयवर्धने, विरेंद्र सेहवाग, केएल राहुल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.