सातारा – जिल्ह्यातील 86 जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी दुपारी दिली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2642 झाली आहे. जिल्ह्यातील तीन करोनाबाधितांचा म्रुत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 86 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
वाई तालुक्यातील परखंदी येथील 70, 57, 37, वर्षीय पुरुष व 11 वर्षाचा युवक, सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, भुईज येथील 32 वर्षाचा पुरुष, पसरणी येथील 67 वर्षीय महिला, 11 व 14 वर्षाचा बालक, 36, 76, 39 वर्षीय पुरुष, वाई येथील 40 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 34 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक व 8 वर्षीय बालिका, विंग येथील 34, 28 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील काझी कॉलनी 39 वर्षीय महिला, शिरवळ येथील 10 वर्षीय बालिका, पाडेगाव 55 वर्षीय महिला, म्हावशी येथील 41, 65 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील जिहे येथील 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 55, 46 वर्षीय पुरुष, शांतीनगर सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, देगावरोड 39 वर्षीय पुरुष, सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 27 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, खातगुण येथील 85 वर्षीय महिला,
माण तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, अंथणी येथील 60 वर्षीय पुरुष,
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 61, 63, 37, 63, 48, 27, 37 वर्षीय महिला व 63 व 39 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष,
फलटण तालुक्यातील शिवाजीनगर फलटण येथील 33 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 54 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान 29 व 24 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 33 व 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचा बालक, 3 वर्षीय बालिका. जिंती नाका येथील 36 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 33 वर्षिय महिला व 58 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील नेरले येथील35, 48 वर्षीय पुरुष, माहीद 55, 48 वर्षीय महिला खाले 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय महिला, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 52 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 40, 23 वर्षीय पुरुष, 13 व 17 युवक
कराड तालुक्यातील शामगाव येथील 76 व 70 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 60, 65, 40 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 45 वर्षीय महिला, टेंबू येथील 40 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुष.
म्हासोली 24 येथील वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 27 वर्षीय महिला, रेठरे येथील 29 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक येथील 26 व 60 वर्षीय पुरुष,
जावळी तालुक्यातील सायगाव येथील 22 वर्षीय तरुणी व 18 वर्षीय तरुण , 34 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष,
तीन बाधितांचा मृत्यू
कराडच्या शारदा हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ ता. कराड येथील 53 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा, सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयात अहिरे ता. खंडाळा येथील 77 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा व सातारा शहरातील खासगी हॉस्पिटल येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणीत करोनाबाधित आलेला गुरुवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा अशा 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने 22620 एकूण बाधित 2642
घरी सोडण्यात आलेले 1439 मृत्यू 90 उपचारार्थ रुग्ण 1113