तुषारभाऊंनी जोपासली सामाजिक बांधिलकी!
करोना विषाणूमुळे जगासह आपल्या पिंपरी-चिंचवड शहरावरदेखील महाभयंकर संकट आलेले आहे व त्यामध्ये जगभरात लाखो तर शहरात अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या देशांनी व तेथील नागरिकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यांना करोनाने जवळजवळ गिळंकृत करणे सुरु केले आहे.
भारतामध्ये देखील याची लागण झाली आहे त्यात सर्वात जास्त महाराष्ट्र बाधित झाला आहे. विशेषत: मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर जास्त प्रभावित झाला आहे. मृत्यूची घंटा वाजायला लागलेली आहे. अशा परिस्थितीत सर्वांचेच जगणे मुश्किल झाले आहे. गरीब-श्रीमंत, लहान-थोर, उच्च-कनिष्ठ असा कोणताही भेदभाव न करता करोनाची सर्रासपणे लागण होतेय. या परिस्थितीत खऱ्या अर्थाने माणसातील देवाचे दर्शन प्रत्येकालाच घडले. आणि खऱ्या अर्थाने करोना योद्ध्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अव्याहतपणे हे योद्धे लढत आहेत. त्यामध्ये त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हेच आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. शिवाय शासनाने स्वच्छतेसंबंधी तसेच दैनंदिन जीवनात आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या महापालिकेने करोनासंदर्भात ठरवून दिलेल्या नियमावलीचेही पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
सुरक्षित अंतर पाळा, घराबाहेर पडू नका. तोंडाला मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, अशा अनेक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सुमारे 4 महिने सलगपणे लॉकडाऊनजन्य परिस्थिती आहे. अशात लोकांनी खायचे काय? ज्या ठिकाणी करोना बाधितांची संख्येत वाढ होत आहे ती ठिकाणे शासन पूर्णतः सील करते आहे. तिथल्या लोकांच्या गरजांचाही साधा विचार होत नाही. अशीच काहीसी भयानक परिस्थिती आपल्या शहरावर ओढावली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात रोजच करोनाचे रुग्ण मिळू लागल्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. पिंपळे निलखसारखा उच्चशिक्षित प्रभागदेखील करोनाच्या विळख्यात सापडला आहे.
मात्र, या प्रभागाचे धडाडीचे नगरसेवक तथा जनसेवक असलेले तुषारभाऊ कामठे या महामारीसारख्या परिस्थितीतही आपल्या जनतेचे प्राण वाचविण्यासाठी तसेच करोनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. करोना योद्धाचे कर्तव्य ते अव्याहतपणे बजावित आहेत. शेकडो लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यापासून जनतेमध्ये करोना विषयक जनजागृती करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. घाबरू नका केवळ स्वत:ची काळजी, करोनाचे नियम पाळा, सुरक्षित अंतर पाळा, अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशी जनजागृती ते सातत्याने करत आहेत. तुषार भाऊंचे काम खरेच अभिमानास्पद आहे. भाऊंच्या या कार्याला मनापासून सलाम!
एका बाजूला जनतेच्या अडचणी सोडविण्यात व्यस्त असतानाच रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर शहरातील पहिले रक्तदान शिबिर प्रभागात घेऊन त्यांनी करोना बाधितांना रक्ताचा तुटवडा जाणावणार नाही यासाठी काळजी घेतली. हा उपक्रम हाती घेतानाच सर्वसामान्य नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी दहा हजारांहून अधिक नागरिकांना त्यांनी “अर्सेनिक अल्बम – 30′ या गोळ्या स्वखर्चाने मोफत वाटून सामाजिक दायित्व जोपासले. पिंपळे-निलख विशालनगर हा प्रभाग करोनामुक्त कसा राहिल यासाठी त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून घेतलेली मेहनत निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे.
गोरगरिबांचे काम करोनामुळे गेल्यामुळे तुषारभाऊंनी गरिबांसाठी हाती घेतलेल्या उपमक्रमामुळे अनेकांना दिलासा मिळाला. सोसायट्यांमध्ये करोनामुळे मोलकरीण, सफाई कामगार, वाहनचालक यांचे हातचे काम गेले होते. मात्र सोसायटीधारकांना आवाहन करत या गरीब कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू न देता त्यांना अडचणीच्या कालावधीत जगण्यासाठी दिलेला हात निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अडचणीच्या कालावधीत प्रत्येकाने एकमेकांना मदत केलीच पाहिजे हा त्यांचा आग्रह सर्वांनाच प्रेरणा देणारा आणि अडचणींवर मात करणारा ठरला आहे. प्रभागातील नागरिकांची काळजी घेतानाच महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम हाती घेतले जावेत, जास्तीत जास्त डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडून राबवून घेतलेल उपक्रमदेखील अभिमानस्पद आहेत.
।। माझा प्रभाग, माझी जबाबदारी ।।
डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, आदी शासकीय कर्मचारी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या सर्वच देवदूतांचे मी सर्वप्रथम मनःपूर्वक आभार मानतो. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडसाठी वायसीएम रुग्णालय देवदूतच बनले आहे. येथील सर्व डॉक्टर, नर्स व पदाधिकारी यांचे मी जाहीर आभार मानतो. आजारी लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच राहा, रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका. रुमाल कपडे वरचेवर बदला, स्वच्छ ठेवा. स्वतंत्र खोलीत राहा. आपल्या समोर कोणी आल्यास मात्र नाक-तोंड झाकून घ्या.
आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही, याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. आपण क्लिनिकच्या प्रतीक्षालयासारख्या ठिकाणी गेल्यावर फेसमास्क घातल्यास आपण आपला आजार इतरांपर्यंत पसरवणे टाळू शकता. करोनामुक्तीसाठी प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे आणि प्रत्येकजण ही जबाबदारी पार पाडेल. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्यास आणि प्रशासनाचे नियम पाळल्यास आपण निश्चितच करोनाला हरवू.
– तुषारभाऊ कामठे (नगरसेवक)