विश्वेश्वर बॅंकेकडून 8 टक्के लाभांश; बॅंकेचा एकूण व्यवसाय 2,489 कोटी रुपयांवर

पुणे – दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लिमिटेड, पुणेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी 2020-21 साठी सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर करून त्याच दिवशी सर्व सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला.

यावेळी बॅंकेचे अध्यक्ष सुनील ना रुकारी यांनी सांगितले की, मार्च 2021 अखेर बॅंकेच्या ठेवी रुपये 1,588 कोटी असून, कर्जवितरण रुपये 901 कोटी आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय 12,489 कोटी रुपयांवर गेला आहे. बॅंकेचा सीआरएआर 17.26 टक्के असून सकल नफा रुपये 32.73 कोटी इतका आहे. बॅंकेला ऑडीट वर्ग अ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

बॅंकेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोल्डन ज्युबली ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा दिला जाणार आहे. बॅंकेने व्यवस्थापन मंडळाची स्थापना करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी सांगितले की, बॅंकेने नवीन सीबीएस प्रणाली कार्यान्वित केली असून चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसायवाढ व वसुली करण्याचा संकल्प केला आहे.

बॅंकेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य बॅंकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला बॅंकेच्या उपाध्यक्ष सीमंतिनी तोडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.