प्रिंटिंग, पॅकेजिंगवरील जीएसटी कमी करण्याची मागणी

पुणे – प्रिंटिंग व्यवसायाकडून एक व्यवसाय एक कर ही मागणी करण्यात आली होती. ती जीएसटी परिषदेने मान्य केली. मात्र सर्व प्रिंटेड उत्पादनावर गरजेपेक्षा जास्त म्हणजे 18 टक्‍के जीएसटी लागू केल्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

त्यामुळे जीएसटी कमी करून 12 टक्के करण्याची मागणी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटरचे अध्यक्ष कमल चोपडा यांनी केली आहे. अगोदर 5%, 12%, 18% असा कर विविध उत्पादनावर लावला जात होता. त्यामुळे गोंधळ उडत होता. आता मूलभूत कच्चा माल म्हणजे कागदावर 12 टक्के जीएसटी आकारला जातो व प्रिंटिंग आणि पॅकेजिंगच्या उत्पादनावर 18% जीएसटी लागू केला जात आहे.

त्यामुळे सर्व बाबीवरील कर सहा टक्के वाढला आहे. यामुळे विविध प्रिंटेड उत्पादने महाग होऊन त्याची मागणी कमी होईल. अगोसरच हा व्यवसाय अडचणीत असताना जास्त जीएसटीचा या व्यवसायावर परिणाम होईल. त्यासाठी प्रिंटिंग व पॅकेजिंग उद्योगातील सर्व स्तरावर सरकारने 12 टक्के जीएसटी लागू करावा असे या व्यवसायाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.