श्रीनगर : काश्मिरमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या अन्य दोन जणांना बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. त्यामुळे त्या राज्यात बाधितांची संख्या 11वर पोहोचली आहे.
राज्याचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातून आलेल्या आणि 24 मार्च रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झालेल्या एका व्यक्तीच्या या नाती आहेत. त्यात एक आठ महिन्याची तर एक सात वर्षीय आहे. बांदीपोरा जिल्ह्यात चार जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या दुसऱ्या दिवशी ही बाधा झाल्याचे आढळले.
काश्मिरात कोरोनाबाधिताचा गुरूवारी पहिला मृत्यू झाला. 65 वर्षीय व्यक्तीची प्राणज्योत मालवली. ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली होती. त्यापैकी चार जणांना बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण दिल्लीत झालेल्या तबलिघी जमात या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात मलेशिया आणि इडोनेशिया येथील नागरिक सहभागी झाले होते, असे सांगण्यात आले.