7th Pay Commission: यावेळची दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक उज्ज्वल होईल. वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करून (DA Hike) भेट देऊ शकते. याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते, पण आता वृत्तांद्वारे प्राप्त झालेल्या अपडेट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट देऊ शकते. यावेळी डीए 4 टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महागाई भत्ता वाढून 46 टक्के होणार –
नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के (4% DA Hike) वाढ केल्यास, तो सध्याच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के होईल. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे की या दिवाळीत सरकार दुसरी डीए वाढ जाहीर करेल.
डीएमध्ये वर्षातून दोन वेळा सुधारणा –
सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना 1 जानेवारी व 1 जुलैपासून दिला जातो. सन 2023 साठी, सरकारने पहिली दुरुस्ती करून 24 मार्च 2023 रोजी डीए वाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर 1 जानेवारी 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे. त्यानंतर केंद्राने कर्मचाऱ्यांना दिला जाणारा 38 टक्के डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केला होता. आता सरकारने दिवाळी दिवसांत महागाई भत्ता वाढवला तर त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून मिळणार आहे.
महागाईच्या आधारावर निर्णय घेतला जातो –
कर्मचारी सतत 4 टक्के डीए वाढीची मागणी करत आहेत आणि प्रसारमाध्यमांनीही महागाई भत्त्यात 3-4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हंटले आहे. कर्मचार्यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. महागाईचा दर लक्षात घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे.
यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै 2023 मध्ये, CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास तो सुमारे 0.90टक्के अधिक होता. यापूर्वी जून 2023 मध्ये ते 136.4 होते आणि मे महिन्यात ते 134.7 होते. तथापि, जर आपण ऑगस्टबद्दल बोललो तर 0.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे आणि ती 139.2 टक्क्यांवर आला आहे. मात्र, मे-जून महिन्याच्या तुलनेत ते अजूनही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत सरकार 4 ऐवजी 3 टक्के वाढ देऊ शकते, म्हणजेच महागाई भत्ता 42 वरून 45 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताही काही जण वर्तवत आहे.