World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
टीम इंडियाची विजयाच्या दिशेने वाटचाल…
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध नुकतेच अर्धशतक पूर्ण केले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने 16 षटकात 2 बाद 116 धावा केल्या आहेत. सध्या क्रीजवर रोहित 65*(47)आणि श्रेयस अय्यर 17*(20) धावांवर नाबाद आहे. भारताला विजयासाठी 34 षटकात 76 धावा करायच्या आहेत.
On a roll & how! 🙌 🙌
2⃣nd successive FIFTY-plus score for captain Rohit Sharma! 👏 👏#TeamIndia inching closer to 100 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/TehJbmEhrt
— BCCI (@BCCI) October 14, 2023
गिल आणि कोहली लवकर बाद…
विराट कोहलीच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. तो 16 धावा करून बाद झाला. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हसन अलीने त्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले. कोहलीने 18 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याने तीन चौकार मारले. भारतीय संघाला 23 धावांवर पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शुभमन गिलला बाद केले. गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. गिलला शादाब खानने झेलबाद केले.
Innings Break!
A cracker of a bowling performance from #TeamIndia! 👌 👌
Jasprit Bumrah, Kuldeep Yadav, Ravindra Jadeja, Hardik Pandya & Mohd. Siraj share the spoils with 2️⃣ wickets each!
Scorecard ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/omDQZnAbg7
— BCCI (@BCCI) October 14, 2023
तत्पूर्वी, पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.
टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाज बुमराहनं 7 षटकात 19 धावा तर सिराजनं 8 षटकांत 50 धावा दिल्या. शार्दुलनं अवघे दोन षटक टाकले अन् 12 धावा दिल्या. अष्टपैलू हार्दिकनं 6 षटकात 34 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवनं 10 षटक पूर्ण करताना 35 तर जडेजानं 9.5 षटकात 38 धावा दिल्या.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.