सणबूर – विधिमंडळाच्या अधिवेशनात नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग आणि पुलांच्या कामांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर होण्याची मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावादेखील केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
अर्थसंकल्पात पाटण विधानसभा मतदारसंघातील नाडे-सांगवड-मंद्रुळकोळे-ढेबेवाडी प्रजिमा 58 किमी 0/00 ते 5/00 भाग नवारस्ता ते मरळी रस्ता सुधारणा (आठ कोटी), चरेगाव-चाफळ-दाढोली-महाबळवाडी-येरफळे-त्रिपुडी-चोपडी- बेलवडे-आंब्रुळे- कुसरुंड-नाटोशी रस्ता, त्रिपुडी पुलाचे पोहोचमार्ग व त्यावरील बॉक्स सेलचे बांधकाम (चार कोटी), निसरे-मारुल-गुढे-काळगाव रस्ता सुधारणा (चार कोटी), गमेवाडी-कडववाडी-पाडळोशी-मसुगडेवाडी रस्ता सुधारणा (दोन कोटी), भोसगाव-आंब्रुळकरवाडी-नवीवाडी-रुवले कारळे-पानेरी रुंदीकरण व सुधारणा (पाच कोटी), काटेवाडी-आवर्डे- मुरुड-मालोशी रस्ता सुधारणा (एक कोटी), इजिमा 138 ते निगडे-कसणी-निवी-डाकेवाडी-धामणी ते चव्हाणवाडी-मस्करवाडी- घराळवाडी रस्ता सुधारणा (तीन कोटी), डिचोली-शेणोली स्टेशन रस्ता सुधारणा (सहा कोटी), साजूर पुलाचे बांधकाम, साजूर-उत्तर तांबवे रस्ता सुधारणा (चार कोटी), काढोली गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम (पाच कोटी), तारळी नदीवर मोठा पूल (आठ कोटी), असा एकूण 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
डोंगरी भागातील सोनवडे-खांडेकरवाडी रस्ता सुधारणा (35 लाख), खुडुपलेवाडी-गावडेवाडी रस्ता (एक कोटी), जाधववाडी जोडरस्ता (25 लाख), नाव-गोवारे पोहोच रस्ता (70 लाख), शितपवाडी (30 लाख), मत्रेवाडी-पवारवाडी-निवी रस्ता सुधारणा (दीड कोटी), जंगलवाडी -चाफळ (40 लाख), डेरवण- कोळेकरवाडी रस्ता (40 लाख), शिरळ-काजारवाडी जोडरस्ता (15 लाख), सोनाईचीवाडी रस्ता सुधारणा (30 लाख), प्रजिमा 29 ते कारवट-गुणुगलेवाडी रस्ता (70 लाख), बिबी-मकाईचीवाडी रस्ता (30 लाख), पाटण-टोळेवाडी-घेरा दातेगड-विठ्ठलवाडी-सावंतवाडी-नाणेल रस्ता (60 लाख), खोणोली-कोचरेवाडी रस्ता (35 लाख), चव्हाणवाडी-वरची जाळगेवाडी रस्ता (70 लाख), येराड जोडरस्ता-रोमनवाडी-हुंबरपेढा-ढेरुगडेवाडी (70 लाख), मान्याचीवाडी-गुंजाळी रस्ता (20 लाख), कुसरुंड-शिंदेवाडी-पाटील वस्ती रस्ता (30 लाख), राज्य मार्ग 148 ते हुंबरवाडी (30 लाख), राज्य मार्ग 136 ते सुभाषनगर (30 लाख), कोरिवळे-टेळेवाडी रस्ता (30 लाख), पाडळोशी-नारळवाडी-तावरेवाडी (35 लाख), पानवळवाडी-मालदन (40 लाख), वेताळवाडी-खिलारवाडी (30 लाख), प्रजिमा 54-मोरेवाडी-मान्याचीवाडी-चव्हाणवाडी रस्ता (30 लाख),
माटेकरवाडी-वरेकरवाडी-कुंभारगाव रस्ता (50 लाख), मोगरवाडी-कोंजवडे (20 लाख), सडावाघापूर-बोर्गेवाडी-मेंढोशी (40 लाख), भालेकरवाडी-धडामवाडी-वाल्मिकी (एक कोटी), सवारवाडी-बेंदवाडी ते कडवे बुद्रुक ग्रामीण मार्ग 7 भाग माळ वस्ती-सवारवाडी-बेंदवाडी रस्ता सुधारणा (40 लाख), नुने-जाधववाडी ग्रामीण मार्ग सुधारणा (20 लाख), दुसाळे-चव्हाणवाडी रस्ता (25 लाख), वजरोशी-करमाळे रस्ता (40 लाख), मणदुरे-स्वागतवाडी-दिवशी खुर्द (15 लाख), प्रजिमा 29 ते काठी टेक-अवसरी (50 लाख), प्रजिमा 57 ते म्हारवंड-भारसाखळे (50 लाख), जाईचीवाडी- मराठवाडी (80 लाख), धडामवाडी-केरळ-खिवशी-राजवाडा (25 लाख), कुसवडे फाटा-काठी टेक-पळासरी रस्ता (40 लाख), गोठणे जोडरस्ता (70 लाख), डिगेवाडी-काळेवाडी (60 लाख), प्रजिमा 37 ते पाबळवाडी (40 लाख), चिंचेवाडी-वजरोशी (30 लाख), दुसाळे-सडा दुसाळे (40 लाख), दिवशी-जुंगठी (50 लाख),
देवघर-तामकणे (40 लाख), कोंढावळे- हरिजन वस्ती (15 लाख), देवघर-गोवारे (25 लाख), शिंदेवाडी-धजगाव-धडामवाडी (15 लाख), मारग वस्ती-मणदुरे (15 लाख), चोपडी जोडरस्ता (30 लाख), जिंती-जितकरवाडी (20 लाख), पांढरेपाणी (25 लाख), गमेवाडी-डेळेवाडी पोहोच रस्ता (70 लाख), तांबवे-डेळेवाडी (30 लाख), पश्चिम सुपने (30 लाख), आरेवाडी-दक्षिण तांबवे (50 लाख), साकुर्डी वस्ती जोडरस्ता (30 लाख), पाडळी-केसे (20 लाख), तांबवे-मोळेवाडी- आरेवाडी-गमेवाडी-पाठरवाडी (30 लाख) या कामांना मंजुरी मिळाली आहे.
रस्ते व पुलांसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल देसाई यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आभार मानले आहेत. निविदा प्रक्रिया तातडीने करून कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.