पुणे -जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यासाठी दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीची नोटीस येत्या मंगळवारी (दि.15) संबंधित तालुक्याचे तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत.
राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यामध्ये 66 ग्रामपंचायत, आंबेगावमध्ये 29 ग्रामपंचायत, खेड मध्ये 90, शिरूरमध्ये 71, मावळमध्ये 57, मुळशीमध्ये 45, हवेलीमध्ये 54, वेल्हे तालुक्यात 31, भोरमध्ये 73, पुरंदरमध्ये 68, दौंड तालुक्यात 51, इंदापूर 60 आणि बारामती तालुक्यात 52 ग्रामपंचायती अशा एकूण 747 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्याने ऐन थंडीत आता गावागावातील जोरबैठकांना वेग येणार आहे.