करोनाबाधितांमध्ये मुलांचे 7.32 टक्के प्रमाण

पिंपरी – करोनाबाधितांमध्ये शून्य ते 12 वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक कमी आढळले आहे. 6 हजार 611 मुलांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत 7.32 टक्के इतके प्रमाण आहे.

महापालिका संकेतस्थळावरील कोवीड डॅशबोर्डनुसार, आज सायंकाळपर्यंत एकूण 90 हजार 312 जणांना करोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी 86 हजाराहून आधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

एकूण करोनाबाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत शून्य ते 12 वयोगटातील 6 हजार 611 मुलांना करोनाची लागण झाली. हे प्रमाण 7.32 टक्के इतके आढळले आहे. तुलनेत 13 ते 21 वयोगटातील 7 हजार 439 करोनाबाधित रुग्ण आढळले. टक्केवारीत हे प्रमाण 8.23 टक्के इतके आहे.

तरुणांचे प्रमाण सर्वाधिक
करोनाबाधित रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. 22 ते 39 वयोगटातील एकूण 36 हजार 670 रुग्णांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली. टक्केवारीत हे प्रमाण 40.60 टक्के इतके आहे. त्या खालोखाल 40 ते 59 वयोगटातील रुग्णसंख्या आहे. 27 हजार 493 रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. टक्केवारीत हे प्रमाण 30.44 टक्के इतके आहे. आत्तापर्यंत 60 वर्षापुढील 12 हजार 99 ज्येष्ठांना करोनाची लागण झाली.

टक्केवारीमध्ये हे प्रमाण 13.39 टक्के इतके अत्यल्प आहे. आत्तापर्यंत अडीच लाखांहून आधिक रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या 7 हजारांपेक्षा आधिक रुग्ण ऍक्‍टिव्ह होम क्वारंटाइन आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.