नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंञी ग्रामसडक योजनेतंर्गत या मतदार संघातील ६ तालुक्यांतील १६ रस्त्यांना ६३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले, कोपरगांव, नेवासा, राहता, राहूरी, संगमनेर आदी सहा तालुक्यातील सोळा रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत ६३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मतदार संघातील दळणवळणाची मोठी सोय होणार असल्याची माहीती खासदार लोखंडे यांनी दिली.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत सहा तालुक्यातील सोळा रस्ता कामाला मंजूरी मिळवून दिल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर,जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा उप प्रमुख भगवान गंगावणे,तालुका प्रमुख सुरेश डिके,नेवासा शहर प्रमुख बाबा कांगुणे आदींनी खासदार लोखंडे यांचे अभिनंदन केले आहे.