काठमांडू – नेपाळमध्ये आज भूकंपाचा जोरदार (Earthquake in Nepal) धक्का बसला. रिश्टर मापकावर या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी नोंदली गेली होती. आज पहाटेच्या सुमारास नेपाळच्या पश्चिमेकडील भागाला हा भूकंपाचा धक्का जाणवला. या भागापासून अगदी जवळच पंतप्रधान शेर बहादुर देऊबा हे आगामी निवडणुकांसाठी प्रचार करत होते. मात्र भूकंपामुळे या प्रचाराच्या ठिकाणी कोणतेही नुकसान झाले नाही आणि पंतप्रधान सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय भूगर्भशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीमुसार हा भूकंपाचा धक्का रात्री 2 वाजून 12 मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू दोती जिल्ह्यातील खापताड राष्ट्राय उद्यानात होता. भूकंपामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले.
भूकंप झाला तेंव्हा लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे अचानक झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपामुळे 6 जण ठार झाले आणि किमान 5 जण जखमी झाले आहेत, असे गृहमंत्री फणिंद्र पोखरेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
Himachal Assembly Election 2022 : मोदींच्या फोननंतरही बंडखोराचा माघार घेण्यास नकार
भूकंपामुळे पडलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकले असल्याची भीती आहे. नेपाळच्या लष्काराने मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये 20 नोव्हेंबरला प्रांतीय विधानसभा आणि राष्ट्रीय संसदेच्या निवडणुका होणार आहेत.