शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात वारंवार कोरोना रुग्ण आढळून येत असताना आता शिक्रापूर येथे दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एका कंपनी कामगाराची पत्नी व मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका नामांकित कंपनीतील 3 कामगारांना एका मागे एक कोरोनाची बाधा झाली होती, त्यांनतर एका कामगाराच्या घरातील तब्बल 8 जण कोरोनाबाधित झाले असताना त्याच कंपनीतील करंजेनगर येथे राहणाऱ्या एका कंपनी कामगाराने कंपनीमध्ये वारंवार रुग्ण आढळून येत असल्याने तपासणी केली असता त्या कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.
त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर कामगाराच्या पत्नी व दोन मुलांचे स्व्याब तपासणीसाठी घेतले असता आज सदर कामगारची पत्नी व मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरातील मनीषा विहार येथे राहणारा आणि रांजणगाव गणपती येथील कंपनीत कामाला असलेला कंपनी कामगार आज कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, तर शिक्रापूर ताजने वस्ती येथे राहणाऱ्या आई पुणे येथील कोथरूड परिसरात मेडिकल मध्ये नोकरीला असलेल्या एका व्यक्तीने खबरदारी म्हणून स्वतःची तपासणी केली असता त्याचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच शिक्रापूर २४ वा मैल परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याला काही त्रास होत असल्याने ते वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होते, त्यांना कोरोना बाबतची काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची तपासणी केली असता त्या दोघांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनतर शिक्रापूर येथे दोन दिवसात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.
दोन दिवसात शिक्रापूर परिसरात 6 रुग्णांची भर पडली शिक्रापूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करत फवारणी करण्यात आली आहे, तसेच सर्व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढून आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.