तैपेई : तैवानमध्ये पुन्हा एकदा पृथ्वी हादरली आहे. माहिती देताना वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितले की, गुरुवारी तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे.
भूकंपामुळे कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तैपेईतील इमारती भूकंपाने हादरल्या आहेत. ब्युरोने सांगितले की भूकंप 5.7 किमी खोलीवर झाला.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दुपारनंतर हुआलियन काउंटीच्या किनारपट्टीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर भूकंप झाला. तर, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने 5.9 तीव्रता आणि 12 किमी खोलीची नोंद केली आहे.
US : ‘गोल्डन गेट ब्रिज’वरुन समुद्रात उडी, भारतीय वंशाच्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल
तैवानमध्ये नियमितपणे भूकंप होत आहेत. तैवान दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ स्थित आहे आणि भूकंपाचा धोका आहे. 2016 मध्ये झालेल्या भूकंपात 100 हून अधिक लोक मरण पावले होते, तर 1999 मध्ये 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.