मुंबई: राज्यात दररोज करोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरूवारी करोनाबाधित 81 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईत चिंता वाढविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मुंबईत एका दिवसात 57 नवीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या 416वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात एकूण 81 नवीन रूग्णांची नोंद झाल्याने राज्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या 416वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक रूग्ण संख्या मुंबईमध्ये वाढताना दिसत आहे. आज मुंबईत आज 57 नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. पुण्यात 6, पिंपरी-चिंचवड 3, अहमदनगर 9, ठाण्यात 5 तर बुलढाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यात करोनामुळे एकूण 19 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे करोनाबाधित एकूण 42 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.