लक्ष्याच्या आठवणीत सलमान जाला भावुक

मुंबई – मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सर्वांचा आवडता विनोदी कलाकार म्हणजेच ‘लक्ष्या’ (लक्ष्मीकांत बेर्डे) यांनी मराठी प्रमाणे हिंदी प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लक्ष्याने अनेक हिंदी कलाकारानं बरोबर काम केले आहे. बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान बरोबर तर त्यांनी “साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन” यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि विशेष म्हणजे यातील त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटांमध्ये सलमानच्या अभिनयासोबतच लक्ष्याच्या देखील अभिनयाचे प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केले होते. सध्या सलमान खान आपला आगामी सिनेमा ‘भारत‘च्या प्रमोशनसाठी अनेक रियालिटीशो मध्ये हजेरी लावत आहे.

दरम्यान, अश्याच एका शो मध्ये सलमान गेला असताना त्याला शो मधील एका स्पर्धकाने साजन या चित्रपटातील “तुमसे मिलने की तमन्ना है” या गाण्यावर नृत्य सादर केलं. हा डान्स पाहून सलमान अतिशय भावुक झाला आणि त्याने लक्ष्या आणि आपल्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. या गाण्यात माझ्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे होते. या गाण्याच्या त्यांच्यासोबतच्या माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आणि याच चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान आम्ही दोघे एकमेंकाचे खूप चांगले मित्र  झालो. तसेच आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. असं सुध्या सलमान यावेळी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)