नारायणगाव – रेस्टॉरंटच्या काउंटरमध्ये ठेवलेली 30 हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी व 24 हजार रोख रक्कम असा 54 हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या आचाऱ्याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली.
रामसिंग चंदन सिंग रावत (मूळ रा. उत्तराखंड, सध्या रा. नारायणगाव) याच्यावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद कपील फॅमिली किचन ऍन्ड बार रेस्टॉरंटचे मालक कपिल चंद्रकांत खैरे (रा. नारायणगाव ता. जुन्नर) यांनी गुरुवारी (दि. 19) दिली आहे.
याबाबत घोडे पाटील यांनी माहिती दिली. रेस्टॉरंटमधील आचारी रावत चोरीनंतर निघून गेला होता. त्यांचा शोध घेतला असता तो पुण्यातील विमाननगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.