मुंबई – देशावरील कोरोना संकटाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतोय. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला कोरोनाने ग्रासले असून देशातील सर्वाधिक रुग्ण मुंबई येथे सापडलेत. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आज ५१० नव्या रुग्णांची भर पडली असून या कालावधीत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज वाढलेल्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९१२३ इतकी झाली असून आतापर्यंत एकूण ३६१ जणांचा कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या १८ रुग्णांपैकी दोन रुग्ण ४० वर्षांखालील, ७ रुग्ण ४० ते ६० वर्षांखालील तर ९ रुग्ण ६० वर्षांवरील होते. दगावलेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे.
याबरोबरच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आजच्या दिवशी १०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यामुळे शहरातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १९०८ वर पोहोचली आहे.
510 new COVID19 positive cases, 18 deaths recorded in Mumbai today, taking the total number of positive cases to 9123, death toll 361: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/tOK1jYWhpA
— ANI (@ANI) May 4, 2020