बिबवेवाडी – येथील ईएसआयसी (एम्प्लाइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) रुग्णालय पालिकेने करोना रुग्णांवर उपचारांसाठी अधिगृहित केले आहे. पण, येथील दुरवस्था आणि गैरसोयींबद्दल “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच येथे 5 व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले आहेत.
या रुग्णालयात ऑक्सिजनचे 25 बेड्सदेखील आता उपचारासाठी देण्यात आले आहेत. याबाबत नगरसेविका मानसी देशपांडे म्हणाल्या, “शहरात दवाखान्यांची अवस्था नाजूक असून पुढील काळात ऑक्सिजनचा पुरवठा मिळताच सर्व ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी सुरू करण्यात येतील. दोन दिवसांत पाच व्हेंटिलेटर व 25 ऑक्सिजन बेड वर रुग्णांना उपचार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.’
“ऍडमिशन के लिए फॉर्म भरना जरुरी है क्या’
रुग्ण उपचारांसाठी ताटकळत रुग्णालयांत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा फॉर्म भरायला लावतात, असे एका चित्रटपटात दाखवले आहे. “ऍडमिशन के लिए फॉर्म भरना जरुरी है क्या’ असे वाक्य त्यातील नायक म्हणतो. रुग्णालयाच्या माणूसकीशून्य भावनांचा अनुभव मी ईएसआयसी दवाखान्यात दोन दिवसांपूर्वी घेतला. यास दै. “प्रभात’ने वाचा फोडली. गंभीर रुगांना दवाखान्यात जागा असेल, तर ताबडतोब उपचार येथे मिळालेच पाहिजेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष नांगरे यांनी म्हटले.