Nagpur Blast : नागपूरमध्ये बाजारगावमध्ये स्फोटके बनविणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या सोलार या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. मात्र सकाळी वाजण्याच्या सुमारास येथे मोठा स्फोट झाला. यात एकूण 9 कर्मचाऱ्यांच्या या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 पुरुष तर 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केला आहे.
नागपुरातील या दुर्दैवी घटनेबाबत फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी लिहिले की, “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे.”
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.
संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2023
पुढे त्यांनी लिहिले की, “नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.” दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.