नवी दिल्ली – संरक्षण दलातील संशोधन कार्यासाठी तसेच नाविन्यपुर्ण उपक्रमांसाठी पुढील पाच वर्षात 499 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. त्या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे दिली.
संरक्षण क्षेत्राशी संबंधीत तीनशे स्टार्टअप उपक्रमांसाठी ही रक्कम वापरण्यात येईल असे ते म्हणाले. संरक्षण दलांचा आयातीवरील खर्च कमी व्हावा आणि देशांतर्गत उत्पादनाना चालना देण्यात यावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
एरोस्पेस सेक्टरमध्ये विकासाला चालना देण्याचाहीं प्रयत्न यातून केला जाणार आहे असेही संरक्षण मंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कमी वेळात संरक्षण दलांच्या गरजांची पूर्तता व्हावी या उद्देशाने ही चालना देण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.