नाशिक – लक्झरी बसमधून तब्बल ४८० किलो गोमांसची अवैधरित्या होणारी वाहतूक वडनेरभैरव पोलिसांनी कारवाई करत उघडकीस आणली असून ७२ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी लक्झरी बससह एकूण ३५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
महामार्गाने लक्झरी बसमधून गोवंश जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह महामार्गावर बसचा (एमएच १८ बीझेड १८५४) पाठलाग करून वडाळीभोई शिवारात थांबविली.
बसची झडती घेतली असता डिक्कीमध्ये ४८० किलो गोवंश मांस आढळून आले. याबाबत बसचालक शरीफ छोटू शाह (४५, रा. साक्री-धुळेरोड, धुळे) व क्लीनर युसुफ कुसूबुद्दीन शेख (५८, रा. १०० फुटी रोड, धुळे) यांना अटक केली. दोघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.