राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात येणार
नवी दिल्ली, दि. 31 – राष्ट्रीय पातळीवर “ग्राहक संरक्षण परिषद’ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे उद्योग व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री ए. सी. जॉर्ज यांनी राज्यसभेत सांगितले. राज्य व जिल्हा पातळ्यांवरही अशा परिषदा स्थापण्याबाबत योग्य वेळी विचार केला जाईल, असे जॉर्ज म्हणाले. ही परिषद ग्राहकांचे प्रश्न व ग्राहकांच्या हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी संपूर्णपणे समजावून घेईल व ग्राहक चळवळीच्या विकासास साहाय्य करील. वस्तूंना रास्त भावात समान वाटपास ही परिषद उत्तेजन देईल
राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी राष्ट्रीय समिती
नवी दिल्ली – महिला कल्याणाकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची अधिक परिणामकारकपणे अंमलबजावणी होण्याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक समिती स्थापन करण्यात येत आहे. आज लोकसभेत शिक्षणमंत्री नुरुल हसन यांनी ही घोषणा केली. लवकरच ही समिती कार्यरत होईल. ते म्हणाले की, या समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान इंदिरा गांधी असतील. समितीमध्ये काही महिला मंत्रीही घेण्यात येतील. उपाध्यक्षपदी स्वतः शिक्षणमंत्री नुरुल हसन असतील.