पुणे – शहरात नव्याने आणखी 467 करोनाचे बाधित सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 13 हजार 153 पर्यंत पोहचली आहे.
मागील आठ दिवसांपासून नमुने तपासणीची संख्या वाढल्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. आज तब्बल 3, 402 जणांचे नमुने घेऊन आरोग्य विभागाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे दहा जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी नवीन 820 बाधित सापडले आहेत.
मंगळवारी दिवसभरात 273 जण करोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घरी सोडलेल्यांची संख्या आता 7 हजार 945 पर्यंत पोहचली आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयात 4 हजार 680 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 277 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 57 बाधित व्हेंटिलेटर आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.