पिंपरी-चिंचवड पालिकेला “अ’ दर्जा
मुंबई, दि. 14 – महाराष्ट्र सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगरपालिकेचा समावेश महाराष्ट्र म्युनिसिपालिटीज ऍक्ट 1965च्या शेड्युल 1 मधील पार्ट 1 मध्ये केला आहे आणि या नवनगरपालिकेला “अ’ दर्जा दिला आहे, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
राष्ट्रीय उत्पन्न वाढले
नवी दिल्ली – केंद्रीय संख्याशास्त्र संघटनेने तयार केलेल्या अंदाजानुसार 1973-74 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1972-73 मध्ये 1971-72 पेक्षा राष्ट्रीय उत्पन्न 49 टक्क्यांनी घटले आहे.
अमेरिकेत तेल व गॅस महागणार
वॉशिंग्टन – अमेरिकेत तेल व नैसर्गिक गॅस यांचे दर वाढवून 18,200 दशलक्ष डॉलर्स अधिक मिळविण्याची योजना अध्यक्ष फोर्ड यांनी जाहीर केली. तेल आता गॅलनमागे 5 सेटस् वाढले तर गॅस 32 टक्क्यांनी वाढला.
शहराकडे जाणारा युवकांचा लोंढा थांबवा
कोईमतूर – सध्याच्या शिक्षणात नवे परिवर्तन झाले पाहिजे व त्यायोगे सुशिक्षित ग्रामीण युवक शेतावरच काम करील, अशारीतीने शहराकडे जाणारा लोंढा कमी होईल, अशी सूचना राज्यपालांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केली.
विनोबाजी सर्व सेवा संघाचा संबंध तोडणार
नागपूर – आचार्य विनोबा भावे यांनी जयप्रकाशांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. बिहारमधील निवडणुका जिंकून बिहारी जनतेचे मत काय आहे ते सिद्ध करा, असे आव्हान इंदिराजींनी दिले होते व ते जयप्रकाशांनी स्वीकारले.
विनोबा म्हणतात, मी निवडणूक लढविण्याचे विरुद्ध आहे. सर्व सेवा संघवाल्यांनी तसा आग्रह धरलाच तर मी संघातून बाहेर पडेल. संघाशी माझा काहीच संबंध राहणार नाही, असे संकेत विनोबांनी यावेळी दिले आहेत.