भारत-अमेरिका संबंध आणखी चांगले होतील
नवी दिल्ली, दि. 13 – अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मातोश्री लिलीयन कार्टर यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. भेटीनंतर कार्टर म्हणाल्या, भेट चांगली झाली. गांधी म्हणाल्या, भारत व अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. ते अधिक चांगले होतील. कार्टर यांनीही दोन्ही देशांचे संबंध चांगले असल्याचा निर्वाळा दिला.
पाकिस्तानमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविले
नवी दिल्ली – दिवगंत भारतीय राष्ट्रपती अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले होते.
निवडणुका “लढवू’ नयेत; “खेळाव्यात’
नागपूर – निवडणुका “लढवू’ नयेत, त्या “खेळाव्यात’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी कॉंग्रेसचे वसंत साठे यांच्याशी बोलताना व्यक्त केले. आज सकाळीच साठे त्यांना भेटले. विनोबाजी त्यांना म्हणाले, निवडणुकांत खिलाडूपणाची भावना ठेवणे, या खेळातील नियम पाळणे जरूर आहे.
विचारस्वातंत्र्य नीतीकडे असते
मुंबई – विचारस्वातंत्र्य हे नेहमी नीतीच्या बाजूला झुकलेले असते, असे उद्गार विख्यात लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी काढले. खरोखर आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, माणसाला माणूस म्हणून नाही कुत्र्यासारखं वागवायचं.