संसदेतील कामकाजाच्या बातम्या छापता येणार नाही
नवी दिल्ली, दि. 8 – आक्षेपार्ह मजकूर छापण्यास वृत्तपत्रांना मनाई करणारा वटहुकूम राष्ट्रपतींनी काढला. दुसऱ्या वटहुकूमान्वये संसदेतील कामकाजाच्या बातम्या छापता येणार नाहीत. तसेच प्रेस काउन्सिल रद्द करणारा तिसरा वटहुकूमही राष्ट्रपतींनी काढला.
संसदीय कामकाजाचे वृत्त छापण्यास संरक्षण देणारा कायदा 1956 साली अस्तित्वात आला होता. सदर कायदा अस्तित्वात आणण्यासाठी फिरोज गांधी हे प्रयत्नशील होते. केंद्र सरकार व हायकोर्ट यांच्या समर्थनाचा मजकूर, शासनावर रचनात्मक टीका करणारा मजकूर छापता येईल.
“पॅसिफिक जाहीरनामा’ तीन कलमांची घोषणा
होनोलुलू – अमेरिकेचे अध्यक्ष जेरॉल्ड फोर्ड यांनी काल रात्री येथे सहा कलमी “पॅसिफिक शांतता जाहीरनामा’ घोषित केला. “सर्वांशी शांततापूर्ण वागणूक व कोणाशीही शत्रुत्व नाही’, असे या जाहीरनाम्याचे सूत्र आहे. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला, त्याच्या 35व्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते.
पॅसिफिक महासागरातील सत्तासमतोलास अमेरिकेचे सामर्थ्य हे पायाभूत आहे, “पॅसिफिक जाहिरनाम्या’तील हे पहिले कलम आहे. जपानशी भागीदारी हा अमेरिकन धोरणाचा आधारस्तंभ आहे हे दुसरे, तर चीनशी संबंध सुरळीत करणे हे तिसरे कलम आहे.