दोहा – थरार कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वकरंडक ( FIFA World Cup ) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतींचा आजपासून प्रारंभ होत आहे. या लढतींतून विजय प्राप्त करत बलाढ्य संघांपैकी उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे पाहण्यासाठी करोडो चाहते उत्सूक बनले आहेत. यंदाच्या स्पर्धेत तुलनेने कमकुवत मानल्या जात असलेल्याच काही संघांनी बलाढ्य संघांना आस्मान दाखवले असल्याने या फेरीतही अशीच टशन दिसेल अशी अपेक्षा आहे.
भारताच्या पराभवाचे होणार पोस्टमार्टेम; बीसीसीआयने बोलावली बैठक
या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या आठ देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलॅंड, पोर्तुगाल, इंग्लंड व फ्रान्स या बलाढ्य संघांचा समावेश आहे. तसेच यातील ब्राझील व अर्जेन्टिना हे दोन संघ दक्षिण अमेरिकेतील आहेत. आफ्रिका खंडातील मोरोक्को या एकमेव संघाला यंदा या फेरीत स्थान मिळाले आहे.
भारताच्या पराभवाचे होणार पोस्टमार्टेम; बीसीसीआयने बोलावली बैठक
युरोपची या स्पर्धेवरील मक्तेदारी 2002 साली ब्राझीलने संपवली होती. मात्र, त्यानंतरही 2006 इटली, 2010 स्पेन, 2014 जर्मनी तर 2018 साली फ्रान्सने विश्वकरंडक ( FIFA World Cup ) जिंकत आपली ताकद दाखवली होती. यंदाही युरोप खंडातील पाच देश उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्याने सलग पाचव्यांदा युरोप खंडातील देशाकडेच करंडक राहणार याची शक्यता जास्त आहे. ब्राझील, अर्जेंटिनाही दावेदार दक्षिण अमेरिकन खंडातील देशांनी करंडक जिंकून दोन दशके झाली. ब्राझीलने 2002 तर, अर्जेन्टिनाने 1986 साली विजेतेपद मिळवले होते.
इतिहास रचण्याची मोरोक्कोलाही संधी
आफ्रिका खंडातील मोरोक्को संघाने यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या स्पर्धेत त्यांच्याकडूनही मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. यापूर्वी कॅमेरून, सेनेगल व घाना या संघांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती मात्र, यातचील कोणालाही विजेतेपदापर्यंत जाता आले नव्हते. यंदा ही उणिव मोरोक्को भरून काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ब्राझीलचा उद्या क्रोएशियाशी सामना
भरात असलेला ब्राझील व यंदाच्या स्पर्धेत सनसनाटी निकाल देणारा क्रोएशिया यांच्यात आज उपांत्यपूर्व फेरीतील पहिली लढतरंगणार आहे. यंदा जर्मनी किंवा स्पेनसारख्या बलाढ्य संघांनाही पराभवाचा धक्का मिळाला असल्याने या लढतीत क्रोएशिया ब्राझीलला आव्हान देणार का याकडे फुटबॉल जगताचे लक्ष लागले आहे.