सर्वच वस्तूंच्या किमती करांसह छापा
पुणे, दि. 14 – ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून स्थानिक करांसह फक्त किंमत 45 निवडक वस्तूंवर छापण्याचा निर्णय उत्पादकांनी घेतला असल्याने नागरी पुरवठा मंत्री शंकरराव गेडाम यांनी जाहीर केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. ग्राहक पंचायत गेली 2 वर्षे याची मागणी करीत आहे.
स्थानिक कर वेगळे असे लिहिल्याने ग्राहकांची फसवणूक होते, असे मंत्रिमहोदयांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रातील सर्वच वस्तूंवर नक्त किंमत छापून त्या किमतीलाच वस्तू मिळतील अशी योजना ग्राहक हितासाठी उत्पादकांनी आणि शासनाने राबविली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
कंपनी गाऱ्हाण्यांसाठी स्वतंत्र विभाग
नवी दिल्ली – कंपनी व्यवहार खात्यांत लोकांच्या गाऱ्हाण्यांची वाढ घेण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. खात्याच्या प्रमुख कार्यालयातील प्रशासन संचालक हे या विभागाचे प्रमुख असतील.
दररोज 1 तास ते स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकतील. विविध स्वरुपांच्या तक्रारींच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी ठराविक मुदतीची बंधने घालण्यात आली आहेत. तक्रारींच्या स्वरुपांवर मुदत अवलंबून राहील.
हिंदीची सक्ती नाही
नवी दिल्ली – अहिंदी लोकांवर हिंदी भाषा लादली जाणार नाही, असे पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले.