पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान विद्यालयात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परीक्षेला ४५२ विद्यार्थी बसले होते.
पारगाव येथील विद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षा केंद्र क्रमांक- ०१४३ मधील परीक्षा केंद्रात पाच, शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण विद्यार्थी ४५२ प्रविष्ट झाले होते. या परीक्षा केंद्रातील पाच शाळा खालीलप्रमाणे आहेत. श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिंगवे, पंडित जवाहलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,निरगुडसर, दत्तात्रय वळसे पाटील, उच्च माध्यमिक विद्यालय, दत्तात्रयनगर, पारगाव श्री गुरुदेव दत्त, उच्च माध्यमिक विद्यालय, संविंदणे, या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या परीक्षा केंद्राचे उद्घाटन सरपंच श्वेता ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना परीक्षा सूचीमधील नियम सांगितले. तसेच बेलचे वेळापत्रक सांगितले व परीक्षेसाठी स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव ढोबळे व पारमार्थिक सेवा संघाचे संचालक शांताराम ढोबळे यांनी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब पडवळ. गणेश पंडीत, मुख्याध्यापक दत्तू खाडे, सखाराम पुंडे, प्राचार्य प्रकाश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे असून विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे, शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इत्यादी, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके व बिटजमादार सचिन डामसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे, शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स ,फॅक्स, आल्या आहेत. केंद्रसंचालक प्रकाश सुतार, उपकेंद्र संचालक अरुण गोरडे, कैलास येलभर, प्रमोद घाडीगावकर, सचिन वाघचौरे यांनी केद्रातील परीक्षेचे काम पाहिले.