राष्ट्रवादीचे 400 कार्यकर्ते भाजपात

पवनानगर   – पवनामावळातील विविध गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 400 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पवनानगर येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात 9 ऑगस्टची श्रद्धांजली नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार व पुनर्वसन राजमंत्री बाळा भेगडे याच्या उपस्थितीत अनेक गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवलीचे सरपंच हिलम, साते गावचे सरपंच सुरेश आगळमे, मळवंडीचे सरपंच ढोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यसह तुंग गावचे माजी सरपंच किसन ठोंबरे, भरत ठोंबरे व माजगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग जांभूळकर, मच्छिंद्र जांभूळकर तसेच ब्राम्हणोली, शिवली, महागाव व आंदर मावळातील अनेक कार्यकर्त्यांनी व आजी-माजी सरपंचानी यावेळी प्रवेश केला.

यावेळी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती एकनाथ टाळे, रवींद्र भेगडे, सुनिल शेळके, बाळासाहेब घोटकुले, संत तुकारामचे संचालक,माऊली शिंदे, पांडुरंग ठाकर ,सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, महिला अध्यक्षा नंदाताई सातकर, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, नितीन मराठे, किरण राक्षे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप काकडे यांनी केले सूत्रसंचालन गणेश ठाकर तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.