शिक्रापूर – येथील एका कंपनी कामगाराला बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून देतो असे सांगून, मोबाइलवर आलेले पिन नंबर घेऊन चाळीस हजार रुपयांना गंडा घातला. शशांक राजेशकुमार जयस्वाल (रा. पाबळ चौक, शिक्रापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांकने त्याच्या वापरासाठी ऍक्सिस बॅंकेमध्ये खाते काढलेले असून त्या बॅंकेचे क्रेडिट कार्डदेखील घेतलेले आहे. 21 जून रोजी या कामगार युवकाला एका मोबाइलवरून बोलत कार्डचा पिन नंबर घेतला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या मोबाइलवर आपल्या खात्यातील चाळीस हजार चारशे रुपये कट झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक केली असल्याची खात्री त्या युवकाची झाल्याने त्याने पोलीस ठाणे गाठले.