नवी दिल्ली – शहरातील अक्षरधाम मंदिरासमोर एका चारचाकीतून जाणाऱ्या चौघांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित फरार झाले आहेत. या भागात पोलिसांनी आता शोध मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, हे चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून जात होते. दिल्ली पोलिसांच्या पथकाने अक्षरधाम मंदिराजवळ त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर गाडीतील सशस्त्रधारी संशयितांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार करताच आरोपी फरार झाले. आरोपी गीता कॉलनीच्या दिशेने बेपत्ता झाले.