नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथे आज सकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये राष्ट्रीय स्तरावरील 4 हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना होशंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग -69 वर घडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Madhya Pradesh: Four national level hockey players dead, three injured, in a car accident in Hoshangabad pic.twitter.com/otLiRNQzoQ
— ANI (@ANI) October 14, 2019
होशंगाबाद येथे होणाऱ्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हे सर्व हॉकीपटू जात होते. स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व हॉकीपटू प्रवास करत होते. अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. ही धडक एवढी भयानक होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, अपघाताच्या कार भरधाव वेगात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधून 7 जण प्रवास करत होते. अपघातामध्ये 4 हॉकीपटूंचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.