हवेलीतून शिवतारेंना 35 हजारांचे लीड देणार

जालिंदर कामठे : फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

फुरसुंगी – हवेली तालुक्‍यातून राज्यमंत्री विजय शिवतारे यांना 35 हजारांचे मताधिक्‍क्‍य देणार असल्याची ग्वाही भाजप नेते जालिंदर कामठे आणि हवेली तालुका शिवसेनेचे नेते शंकर हरपळे यांनी दिली.

पुरंदर-हवेली विधानसभा मतरासंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने रविवारी (दि. 13) फुरसुंगी, भेकराईनगर, गंगानगर व परिसरात प्रचाररॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला, त्यावेळी कामठे, हरपळे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव सायकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कैलास ढोरे, हवेली भाजपा सरचिटणीस धनंजय कामठे, राहुल शेवाळे, हवेली कार्याध्यक्ष नितीन जांभळे, भाजप किसान मोर्चाचे केशव कामठे, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, किशोर पोकळे, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, संतोष हरपळे, गणपत दगडे, संदिप हरपळे, विजय हरपळे, चकीत देशमुख, जितेंद्र देशमुख, ज्ञानेश्‍वर कामठे, राजू चंद, तानाजी कामठे, गणेश कामठे, महेश हरपळे, नितीन गावडे, रुपेश मोरे, सतीश जगताप, विठ्ठल कामठे, नागेश हरपळे, केशव सायकर, धनंजय हरपळे, अक्षय कामठे, जितेंद्र कामठे, नितीन कामठे, सुजित थेवरे, राहुल पवार, शादाब मुलाणी, निर्मला मेमाणे, उषा ढोरे, महिला आघाडीच्या सविता ढवळे, विजया भारती, आशा कांबळे, बाळकृष्ण कामठे, बाळासाहेब हरपळे, निलेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय शिवतारे म्हणाले की, पुरंदर आणि हवेली तालुक्‍यात विरोधक ज्या रस्त्यांवरून गावे पिंजून काढत आहेत, तो प्रत्येक रस्ता आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे विकासाबाबत प्रश्‍न विचारताना त्यांनी आधी या गोष्टीचा विचार करावा, असे त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्ताकाळात जी कामे होऊ शकली नाहीत ती महायुतीने अवघ्या 5 वर्षांत केलेली आहेत. कचरा कॅपिंग, फुरसुंगी उरुळी देवाची पाणीयोजना, मंतरवाडी खडीमशीन चौक रस्ता, फुरसुंगी वडकी रस्ता, भेकराईनगर ते फुरसुंगी रस्ता, फुरसुंगी मांजरी रस्ता, भेकराई, ढमाळवाडी, पापडेवस्ती मधील सर्व कॉंक्रिट रस्ते अशी जवळपास 600 कोटींची कामे आपण या परिसरात करू शकलो. त्यामुळे हवेलीतून प्रचंड मताधिक्‍य मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
– विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.