सातारा जिल्ह्यात 36 नागरिक करोनाबाधित

सातारा – जिल्ह्यात सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी जाहीर करण्यात आली असतानाच, काल आलेल्या अहवालांनुसार जिल्ह्यात आणखी 36 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. पॉझिटिव्ह अहवालांची संख्या कमी आली असताना, गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी न झाल्याने दिलासा मिळाला आहे; परंतु वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी “सवयभान’ जपणे आवश्‍यक आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात सदरबझार, प्रतापगंज पेठ प्रत्येकी एक, इतरत्र दोन, विकासनगर, खिंडवाडी प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात कराड शहर चार, विद्यानगर एक, फलटण तालुक्‍यात तांबवे तीन, फलटण शहर, गुणवरे प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात खटाव, नेर प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात मोगराळे, बिजवडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव तीन, तांदुळवाडी, त्रिपुटी प्रत्येकी एक,

खंडाळा तालुक्‍यात शिरवळ, लोणंद, खंडाळा प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात येरणे, दांडेघर प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात आरडे दोन, इतर दोन, बाहेरील जिल्ह्यातील सांगली एक, असे 36 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 58 हजार 64 झाली असून, करोनाबळी 1848 आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.